“कै.सुकन्या विक्रम चव्हाण यांचे हृदयविकाराने दु:खद निधन” - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

“कै.सुकन्या विक्रम चव्हाण यांचे हृदयविकाराने दु:खद निधन”

(राहुरी : श्रेयस लोळगे) राहुरी शहरातील प्रसिद्ध व्यापारी मा.श्री.विक्रम चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी सुकन्या विक्रम चव्हाण यांचे आज ११ डिसें...

(राहुरी : श्रेयस लोळगे)

राहुरी शहरातील प्रसिद्ध व्यापारी मा.श्री.विक्रम चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी सुकन्या विक्रम चव्हाण यांचे आज ११ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे अंदाजे ५ ते साडेपाचच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाने राहुरी शहरातील व्यापारी वर्ग, सामाजिक क्षेत्र तसेच नागरिकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

अतिशय हुशार, शांत, संयमी, सर्वांना प्रेमाने मिळून मिसळून बोलणाऱ्या आणि समाजमनात आपलेपणा जपणाऱ्या सुकन्या ताईंच्या जाण्याने चव्हाण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या सामाजिक वर्तुळातही हे निधन अत्यंत दुःखद धक्का म्हणून पाहिले जात आहे.

चव्हाण परिवाराच्या दुःखात राहुरीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होत संवेदना व्यक्त केल्या आहेत.

त्यांच्या पश्चात पती विक्रम, मुले दिग्विजय आणि अजिंक्य असा परिवार आहे.

📍 अंत्यविधी आजच, ११ डिसेंबर, दुपारी २ वाजता, राहुरी शहरातील गणपती घाट स्मशानभूमी येथे होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत