राहुरी शहरात खळबळ; कोर्ट परिसरात ४ बिबट्यांचे दर्शन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी शहरात खळबळ; कोर्ट परिसरात ४ बिबट्यांचे दर्शन

(राहुरी : श्रेयस लोळगे) राहुरी शहरात आज सायंकाळी खळबळजनक घटना घडली असून, न्यायालय परिसरालगत चार बिबट्यांचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीती...

(राहुरी : श्रेयस लोळगे)

राहुरी शहरात आज सायंकाळी खळबळजनक घटना घडली असून, न्यायालय परिसरालगत चार बिबट्यांचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज दिनांक १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास, कोर्टाच्या मागील बाजूस असलेल्या गुलमोहर कॉलनी, गुमास्ते मळा परिसरात एक मादी बिबट्या, एक नर बिबट्या व त्यांचे दोन बछडे मुक्तपणे फिरताना दिसून आले.

या घटनेची माहिती परिसरातील वॉचमन व रहिवासी नितीन बाचकर, नितीन देशमुख, समीर शेवाळे, सुशांत भिंगारकर, राकेश खाबिया व श्री. गवते यांनी दिली. बिबट्यांचे दर्शन होताच नागरिकांनी तात्काळ सतर्कता बाळगत एकमेकांना सावध केले.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर साळुंखे, वनपाल राजू रायकर, वनरक्षक बाळू आटोळे, वन कर्मचारी बाबासाहेब सिनारे तसेच वाहन चालक ताराचंद गायकवाड उपस्थित होते.

वन अधिकाऱ्यांनी नागरिकांना घाबरून न जाता शांतता राखण्याचे आवाहन केले असून, उद्या या परिसरात पिंजरा लावून बिबट्यांना पकडण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडणे टाळावे आणि लहान मुलांकडे विशेष लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी, दाट वस्तीच्या भागात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांकडून वनविभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत