काँग्रेस,महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आ.हेमंत ओगलेंची आज प्रभाग सात,आठ व नऊ साठी शांती चौक व प्रसादनगर येथे सभा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

काँग्रेस,महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आ.हेमंत ओगलेंची आज प्रभाग सात,आठ व नऊ साठी शांती चौक व प्रसादनगर येथे सभा

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस,महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कृष्णा नानासाह...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस,महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कृष्णा नानासाहेब मुसमाडे व नगरसेवक पदांच्या उमेदवारांसाठी आज श्रीरामपूर, राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक सात, आठ व नऊच्या नगरसेवक पदांच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा आज सायंकाळी आयोजित करण्यात आली आहे.

सायंकाळी सहा वाजता प्रसादनगर येथे तर सात वाजता शांती चौक येथे आमदार ओगले यांची प्रचार सभा संपन्न होणार आहे.

 या सभेस श्रीरामपूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे व काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या सभेत उपस्थित राहणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत