देवळाली प्रवरा/वेबटीम:- उद्या २० डिसेंबर रोजी होणाऱ्या देवळाली प्रवरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नगर...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
उद्या २० डिसेंबर रोजी होणाऱ्या देवळाली प्रवरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सत्यजित चंद्रशेखर कदम पाटील तसेच सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे जलसंपदा मंत्री व पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही सभा आज शुक्रवार, दि. १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता देवळाली प्रवरा येथील बाजारतळावर पार पडणार आहे.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यासह भाजपच्या सर्व नगरसेवक उमेदवारांच्या विजयासाठी या सभेला उपस्थित राहून पाठिंबा द्यावा, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत