अहिल्यानगर(वेबटीम) जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या मतदान व मतमोजणी (१८ ते २० डिसेंबर) या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ...
अहिल्यानगर(वेबटीम)
जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या मतदान व मतमोजणी (१८ ते २० डिसेंबर) या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील पोलिसांना विशेष अधिकार प्रदान केले असल्याची माहिती जिल्हा विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी, राहाता, नेवासा, पाथर्डी, देवळाली प्रवरा, श्रीगोंदा आदी नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रांमध्ये हे आदेश लागू राहणार आहेत.
या आदेशानुसार कोणत्याही मिरवणुका रॅली सभा ठरवीलेल्या मार्गाव्यतीरीक्त नेण्यास तसेच दिलेले ठिकाण व वेळ व्यतीरिक्त इतर मार्गाने नेण्यास व वेळेचे उलंघन करण्यास मनाई असून सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व प्रार्थना स्थळाचे आसपास प्रार्थनेच्या वेळी कोणत्याही रस्त्यावरील किंवा सार्वजनिक जागी किवा लोकाचे एकत्र जमण्याचे जागी गर्दी करण्यास किवा अडथळा निर्माण करण्यास मनाई करण्यात आली आहे.
सर्व रस्त्यावर, रस्त्यामध्ये, घाटात, घाटावर सर्व धक्यावर किंवा धक्यामधे आणि सार्वजनिक स्नानाच्या उतारण्याचे ठिकाणी व जागांमध्ये जत्रा, देवालय, मशीद, दर्गा, आणि सार्वजनिक किंवा लोकांच्या जाण्या येण्याच्या जागांमधे गोंधळ बेशिस्तपणे वर्तणुक करण्यास मनाई केली आहे. कोणत्याही रस्त्यात, रस्त्याजवळ किंवा सार्वनजिक अनियमीत व विनापरवाना जागी वाद्य वाजवण्यास, गाणी म्हणण्यास, ढोल, ताशे वाजवण्यास, कर्कश वाद्य वाजवण्यास मनाई तसेच कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागे जवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक उपहाराचे जागेत ध्वनीक्षेपकाचा विनापरवाना उपयोग करण्यास मनाई करण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवा, शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी-कर्मचारी तसेच परवानगीप्राप्त कार्यक्रमांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिला आहे, अशी माहिती जिल्हा विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत