अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्ब धमकी; प्रशासन अलर्ट मोडवर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्ब धमकी; प्रशासन अलर्ट मोडवर

(अहिल्यानगर : श्रेयस लोळगे) अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने आज जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. धमकीची माहि...

(अहिल्यानगर : श्रेयस लोळगे)अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने आज जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. धमकीची माहिती मिळताच तत्काळ सुरक्षायंत्रणा सक्रिय करण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

धमकीनंतर पोलिस, बॉम्ब शोध व नाशक पथक, अग्निशमन दल आणि संबंधित सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कार्यालय परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ये-जा नियंत्रित करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.

दरम्यान, कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिसरात संशयास्पद वस्तूंची तपासणी सुरू असून संपूर्ण परिस्थितीवर वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

धमकी कोणाकडून आणि कोणत्या माध्यमातून आली याबाबत तपास सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत