राहुरीत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल

  राहुरी(वेबटीम) राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त माहिती मिळाली की राहुरी शहरातील कानिफनाथ चौक परिसरात शासनाने प्...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त माहिती मिळाली की राहुरी शहरातील कानिफनाथ चौक परिसरात शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा विक्री केला जात आहे. त्यानुसार दिनांक 27/12/2025 रोजी पथकाने छापा टाकला असता सचिन शांताराम क्षीरसागर (वय 43, रा. कानिफनाथ चौक, राहुरी) हा राहुरीत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची विक्री करताना आढळला.

कारवाई दरम्यान आरोपीकडून सुमारे 7,000 रुपयांचा किंमतीचा रंगीबेरंगी नायलॉन मांजाचे 14 बंडल जप्त करण्यात आले.

सदर प्रकरणी आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम 223, 125 तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,  अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सपोनि सुदाम शिरसाठ, पोहेकॉ सूरज गायकवाड, पोहेकॉ राहुल यादव, पोलीस नाईक नदीम शेख, पोकॉ भाऊसाहेब शिरसाठ व पोकॉ अजिनाथ गिते यांनी केली.

राहुरी पोलीस स्टेशनतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासनाने बंदी केलेला नायलॉन मांजा विक्री अथवा साठवणूक करताना कोणी आढळल्यास तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत