उद्या ३१ डिसेंबरला देवळाली प्रवरा ते शिर्डी भव्य श्री साई पालखी सोहळ्याचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उद्या ३१ डिसेंबरला देवळाली प्रवरा ते शिर्डी भव्य श्री साई पालखी सोहळ्याचे आयोजन

  देवळाली प्रवरा(वेबटीम)  सालाबादप्रमाणे यंदाही देवळाली प्रवरा ते शिर्डी  भव्य श्री साई पालखी सोहळ्याचे उद्या ३१ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात ...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



 सालाबादप्रमाणे यंदाही देवळाली प्रवरा ते शिर्डी  भव्य श्री साई पालखी सोहळ्याचे उद्या ३१ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. 


 यंदाचे हे सोहळ्याचे १२ वे वर्ष असून भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.श्री साईंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सकाळी ७ वाजता श्रीराम मंदिर, येथून पदयात्रेला प्रारंभ होणार असून अनेक भाविक या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. पदयात्रा मार्गात भजन, नामस्मरण यामुळे  भक्तीमय वातावरण राहणार आहे.ठिकठिकाणी चहा पाणी, नाश्ता व महाप्रसादाची अन्नदात्यांकडून व्यवस्था करण्यात आली आहे.


आयोजकांच्या वतीने सर्व साईभक्तांनी पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत