श्रीरामपूर शहरात घरफोडी करणारे रेकॉर्डवरील २ आरोपी जेरबंद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपूर शहरात घरफोडी करणारे रेकॉर्डवरील २ आरोपी जेरबंद

श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर शहरातील घरफोडी प्रकरणात रेकॉर्डवरील दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहेत. फिर्यादी श्री म...

श्रीरामपूर(वेबटीम)



श्रीरामपूर शहरातील घरफोडी प्रकरणात रेकॉर्डवरील दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहेत.

फिर्यादी श्री मोहंमद रफिक शेख (रा. अतिथी कॉलनी, वार्ड नं. १) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २५ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १२:२० वाजता ते कामानिमित्त बाहेर गेलेले असताना घरी परतले असता अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजाचे लॉक तोडून लॉकर व कपाटातील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, घड्याळ, तीन मोबाईल, एटीएम कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स असा एकूण २,१०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला होता.

या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 1111/2025, भा.द.वि. कलम ३३१(४), ३०५ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला.

पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर सोमनाथ घार्गे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पोउपनि संदिप मुरकुटे व पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, रमीजराजा आत्तार, विशाल तनपुरे, भगवान थोरात, योगेश कर्डीले, प्रशांत राठोड यांचा समावेश असलेले पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला.

तपासात मिळालेल्या माहितीनुसार, सदर चोरी रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर शब्बीर शेख (रा. खटकाळी, देवळाली प्रवरा, वय २८) व त्याचे दोन साथीदार – जैद उर्फ सरफराज मुश्ताक सय्यद (रा. इस्लामपूरा, देवळाली प्रवरा, वय २२) आणि विजय उर्फ खंडु इथापे (रा. देवळाली प्रवरा, फरार) यांनी केली असल्याचे स्पष्ट झाले. समीर शेख आणि जैद सय्यद यांना पथकाने ताब्यात घेतले असून, दोघांनी कबुली दिली आहे. विजय इथापे सध्या फरार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत