देवळाली प्रवरा(वेबटीम ) देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणूकितील महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्या विजयी ४ नगरसेवकांनी आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणूकितील महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्या विजयी ४ नगरसेवकांनी आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात गटनोंदणी केली असून गटनेता तथा पक्षप्रतोदपदी तुकाराम उर्फ दासू पठारे यांची निवड करण्यात आली. तर उपगटनेते म्हणून शरद वाळुंज यांची निवड करण्यात आली.
काँग्रेसचे तुकाराम उर्फ दासू पठारे, सुनीता थोरात, शरद वाळुंज, पल्लवी ढुस आदी चार नगरसेवकांचे गटबंधन करण्यात आले आहे.
यावेळी श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे, दत्ता कडू, वैभव गिरमे, आप्पासाहेब ढुस आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत