आई-वडिलांची सेवा करणाऱ्यावर परमेश्वराची अधिक प्रीती – बिशप लूर्डस डॅनिअल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आई-वडिलांची सेवा करणाऱ्यावर परमेश्वराची अधिक प्रीती – बिशप लूर्डस डॅनिअल

देवळाली प्रवरा(वेबटीम) आंबीस्टोअर वस्तीवरील माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक प्रकाश संसारे यांच्या वस्तीवर ख्रिसमसनिमित्त मिस्सा बलिदान व स्नेहभो...

देवळाली प्रवरा(वेबटीम)


आंबीस्टोअर वस्तीवरील माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक प्रकाश संसारे यांच्या वस्तीवर ख्रिसमसनिमित्त मिस्सा बलिदान व स्नेहभोजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.



देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरातील शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून सणाचा आनंद साजरा केला.



नाशिक कॅथोलिक धर्मप्रांताचे महागुरुस्वामी रेव्ह. लूर्डस डॅनियल यांनी मिस्सा बलिदानाचे प्रमुख पौरोहित्य केले. “मनुष्य जीवन सहज मिळालेले नाही. परमेश्वर सर्वांवर प्रेम करतो व आई-वडिलांची सेवा करणाऱ्यावर तो अधिक कृपादृष्टी करतो,” असे त्यांनी प्रवचनातून सांगितले.



कार्यक्रमास जर्मनीचे प्रोफेसर फा. चार्ल्स, श्रीरामपूर धर्मग्राम प्रमुख फा. प्रकाश भालेराव, राहुरी फॅक्टरी धर्मग्रामाचे फा. प्रकाश राऊत, संगमनेर येथील ज्ञानमाता विद्यालयाचे प्राचार्य फा. फ्रान्सिस पटेकर, उपप्राचार्य फा. प्रशांत शहाराव, राहुरी धर्मग्रामाचे फा. संपत, डी.पॉल स्कूलचे उपप्राचार्य फा. जेम्स यांसह अनेक धर्मगुरू उपस्थित होते.



प्रस्ताविकेत नगरसेवक प्रकाश संसारे यांनी सांगितले की, कॉ. मार्शल संसारे यांनी १९९२ पासून या कार्यक्रमाची परंपरा सुरू केली असून संसारे कुटुंब ती अविरत पुढे नेत आहे. फा. भाऊसाहेब संसारे यांच्या धर्मगुरूपदी दिक्षेचा आज वर्धापनदिन असल्याचेही त्यांनी नमूद केले.


कार्यक्रमास राहुरीचे माजी आमदार व शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील कदम, माजी नगराध्यक्ष गोरख  मुसमाडे, मच्छिंद्र कदम आदी मान्यवर उपस्थित होते.



देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सत्यजीत  कदम,  प्रीति कदम, नगरसेवक आजित चव्हाण, अमोल कदम, मनिषा कदम, सौरभ मुसमाडे, सीमा देठे, बेबी बर्डे, संतोष चोळके, चंदाराणी गाडे, राजेंद्र लोखंडे, जयश्री खांदे आदीं नवनिर्वाचित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.


तसेच केदारनाथ चव्हाण, डॉ. प्रवीण कोठूळे, भारत शेटे,  तुषार शेटे, बाबासाहेब शेटे, वैभव गाडे, राजेंद्र लोंढे, कॉ. राजेंद्र बावके, कॉ. बाळासाहेब सुरुडे, कॉ. मदिना शेख, कॉ. जीवन सुरुडे, संतोष झावरे, संभाजी शिंदे, झहीर शेख, सुहास महाजन, राजू महाजन, सचिन सरोदे, संतोष झावरे, प्रा.खांदे, नारायण शेळके सर, डॉ. वरखडे आदी उपस्थित होते.


यावेळी सगुणाबाई संसारे यांच्या हस्ते महागुरुस्वामी तसेच नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांचा सत्कार करण्यात आला. संसारे कुटुंबाच्या वतीने सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सुद्धा गौरव करण्यात आला.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नगरसेवक प्रकाश संसारे यांनी केले.


 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉ. शरद संसारे, सतीश संसारे, रावसाहेब संसारे, ॲड. शशिकांत संसारे, प्रा. विजय संसारे, अजित संसारे, विश्वास संसारे आदींनी परिश्रम घेतले.



ऑपरेशन शिंदूर” , येशू जन्माच्या देखाव्यातून भारतीय सैन्याला सलाम 

येशू जन्माच्या देखाव्यात यंदा “ऑपरेशन शिंदुर” हा अनोखा साज विशेष आकर्षण ठरला. भारतीय सैन्याच्या धैर्य, कर्तृत्व व देशभक्तीचा गौरव करण्यासाठी हा देखावा प्रकर्षाने साकारण्यात आला होता.भारताच्या नकाशासह कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या प्रतिमा रेखाटून त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा अल्पसा परिचय देण्यात आला. देशासाठी कर्तव्य बजावणाऱ्या या वीरांगनांच्या योगदानाला सलाम करण्याचा व युद्ध नको शांति हवी संदेश या देखाव्याद्वारे देण्यात आला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत