श्रीरामपूर/वेबटीम:- येथील जर्मन हॉस्पिटलसमोर बंटी उर्फ अस्लम जहागीरदार यांची 31 डिसेंबर रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरण...
श्रीरामपूर/वेबटीम:-
येथील जर्मन हॉस्पिटलसमोर बंटी उर्फ अस्लम जहागीरदार यांची 31 डिसेंबर रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. एसपी सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू आहे.
कब्रस्तानाजवळ झालेल्या गोळीबारात बंटी जहागीरदार ठार झाला असून त्याचा सोबती अमिन गुलाब शेख जखमी झाला आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अटक झालेल्या आरोपींची नावे
कृष्णा अरुण शिंगारे (23), रा. सिद्धार्थनगर
रविंद्र गौतम निकाळजे (20), रा. भिमनगर असे असून
गुन्ह्यातील शस्त्र कोठून मिळाले, हल्ल्याचा प्लॅन कोणी केला आणि आणखी कोणी सहभागी आहे का, याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. बंटी जहागीरदारवर पुणे बॉम्बस्फोटासह १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
घटनेनंतर शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सोशल मीडियावर अफवा किंवा आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तपास डीवायएसपी भवर व पोनि देशमुख करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत