देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा आजोळ असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले असल्याने त्यांना श्रद्धांज...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरा आजोळ असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले असल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता देवळाली प्रवरा बाजार तळावर सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून देवळाली प्रवरा शहरात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी आयोजित शोकसभेसाठी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत