राहुरी फॅक्टरी(वेबटीम) भारतीय जनता पार्टी, देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी शहर यांच्या वतीने संपर्क कार्यालयाचे उद्घाटन तसेच वैष्णवी महिला ग...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
भारतीय जनता पार्टी, देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी शहर यांच्या वतीने संपर्क कार्यालयाचे उद्घाटन तसेच वैष्णवी महिला गृहउद्योगाचा शुभारंभ गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता उत्साहात संपन्न होणार आहे. यावेळी महिलांसाठी हळदी-कुंकू व वाण वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आ.चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते होणार आहे. तर वैष्णवी गृह उद्योगाचा शुभारंभ नगराध्यक्ष सत्यजित कदम व प्रीती कदम यांच्या हस्ते होणार आहे.
हा कार्यक्रम नगरसेवक वसंत कुंडलिक कदम यांच्या निवासस्थानाशेजारी, वैष्णवी चौक, राहुरी फॅक्टरी येथे होणार असून, भारतीय जनता पार्टी, देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी शहर तसेच वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान व वैष्णवी चौक महिला मंच यांनी या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत