देवळाली प्रवरा देवळाली प्रवरा नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेत विविध विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. मात्र सभेत सर...
देवळाली प्रवरा
देवळाली प्रवरा नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेत विविध विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. मात्र सभेत सर्वाधिक चर्चेत राहिलेला विषय म्हणजे पाणीपट्टी वाढीचा निर्णय ठरला.
नगरपरिषदेकडून नागरिकांसाठी असलेली सुमारे १८०० रुपये पाणीपट्टी वाढवून जवळपास ३ हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शहरवासीयांमध्ये मोठी नाराजी आणि धक्का व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, विरोधी पक्षातील नगरसेवक दासू पठारे, शरद वाळुंज, पल्लवी ढुस आणि सुनीता थोरात तसेच वंचितचे नगरसेवक संतोष चोळके यांनी विरोध करत पाणीपट्टी वाढ मर्यादित ठेवत २००० किंवा २२०० व जास्तीत जास्त अडीच हजार रुपयांपर्यंत ठेवण्याची मागणी केली. मात्र अखेर पाणीपट्टी सुमारे ३ हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला.
या निर्णयाच्या विरोधात आगामी काळात आंदोलन करण्याचा इशारा विरोधी नगरसेवक दासू पठारे, शरद वाळूंज व इतर नगरसेवकांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत