देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील चोथे वस्ती येथील साईसचरित्र पारायण सोहळा भक्तिभावाच्या आणि अध्यात्मिक वातावरणात आयोजित करण्यात ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील चोथे वस्ती येथील साईसचरित्र पारायण सोहळा भक्तिभावाच्या आणि अध्यात्मिक वातावरणात आयोजित करण्यात आला आहे. तसेच साई मंदिराचे काम पूर्ण झाल्याने साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळाही संपन्न होणार आहे. गुरुवार, दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर पारायण सोहळ्यात दररोज सकाळी व सायंकाळी श्री साईसचरित्राचे वाचन, भजन, आरती तसेच प्रवचन आयोजित करण्यात आले आहेत. राज्यातील विविध भागातून आलेले नामवंत प्रवचनकार या सोहळ्यात आपली सेवा सादर करणार आहेत.
गुरुवार दिनांक ०५ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. बाबासाहेब महाराज वाळुंज यांच्या प्रवचनाने सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर ह.भ.प. सुभाष महाराज विधाटे, ह.भ.प. आबा महाराज कोळसे, ह.भ.प. उदय महाराज घोडके, ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री, ह.भ.प. बाबा महाराज मोरे व ह.भ.प. भगवान महाराज मोरे यांची प्रवचने होणार आहेत.
शुक्रवार ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता श्री साईबाबांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या करण्यात येणार असून, त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत उद्धव महाराज मंडलिक कीर्तन व महाप्रसादाने पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे. तरी या सोहळ्यास समस्त ग्रामस्थ व भाविक चोथे वस्ती परिसर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत