राहुरी(वेबटीम ) नगर–शिर्डी महामार्गाचे रखडलेले काम तसेच सुरू असलेल्या भूमिगत गटारींच्या कामामुळे राहुरी व राहुरी कारखाना परिसरातील व्यापारी,...
राहुरी(वेबटीम)
नगर–शिर्डी महामार्गाचे रखडलेले काम तसेच सुरू असलेल्या भूमिगत गटारींच्या कामामुळे राहुरी व राहुरी कारखाना परिसरातील व्यापारी, प्रवासी आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांवरील खड्डे, सततची वाहतूक कोंडी, धूळ-चिखल आणि त्यामुळे व्यवसायावर होणारा परिणाम यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्या थेट मांडण्यासाठी आज बुधवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता ज्ञानेश्वर थिएटर, नवी पेठ, राहुरी येथे जाहीर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीस माजी खासदार सुजयदादा विखे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, नाल्यांच्या कामामुळे व्यवसाय अडचणी,महामार्गावरील अडथळे, वाहतूक कोंडी, धूळ-चिखल, व्यापाऱ्यांचे नुकसान तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. संबंधित यंत्रणांनी ही कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी ठोस मागणी यावेळी करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत