देवळाली प्रवरा(वेबटीम) महाशिवरात्री उत्सवानिमित्त देवळाली प्रवरा शहरात शिवलीलामृत पारायण सोहळा तसेच श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
महाशिवरात्री उत्सवानिमित्त देवळाली प्रवरा शहरात शिवलीलामृत पारायण सोहळा तसेच श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक कार्यक्रम सोमवार दि. ०९ फेब्रुवारी २०२६ ते सोमवार दि. १६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला असून सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या सप्ताहात ह.भ.प. गोरख काका चव्हाण (देवळाली प्रवरा) यांच्या वाणीतून दररोज सायंकाळी ८.०० ते रात्री १०.३० या वेळेत शिवलीलामृत कथा होणार आहे.
महाशिवरात्रीनिमित्त रविवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता महाशिवरात्री उत्सवानिमित्त संगीत प्रवचन होणार असून त्यानंतर खिचडी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सोमवार दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता भागवताचार्य ह.भ.प सरगमताई महेश आगळे महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार असून कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम श्री महादेव मंदिर प्रांगण, देवळाली प्रवरा (ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) येथे आयोजित करण्यात आला असून समस्त देवळाली प्रवरा शहरातील महाशिवरात्री उत्सव कमिटी व पंचक्रोशी भजनी मंडळ यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांनी सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत