राष्ट्रीय कुंभार महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी देवळाली प्रवराच्या रवी दळवी यांची निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राष्ट्रीय कुंभार महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी देवळाली प्रवराच्या रवी दळवी यांची निवड

देवळाली प्रवरा (प्रतिनिधी)  राष्ट्रीय कुंभार महासभा, नवी दिल्ली यांच्या वतीने समाजसेवा व विकास कार्यातील योगदानाची दखल घेत देवळाली प्रवरा ये...

देवळाली प्रवरा (प्रतिनिधी)



 राष्ट्रीय कुंभार महासभा, नवी दिल्ली यांच्या वतीने समाजसेवा व विकास कार्यातील योगदानाची दखल घेत देवळाली प्रवरा येथील रवी उर्फ मनोहर बाळासाहेब दळवी यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गजानन व्यंकटराव कोलमकर यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र देण्यात आले.


समाजाच्या विकास यात्रेत सक्रिय सहभाग, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावी कार्याचा विचार करून २०२५ ते २०२८ या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या प्रगतीसाठी आणि संघटनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सकारात्मक कार्य होईल, असा विश्वास महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


या नियुक्तीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, समाजाच्या उन्नतीसाठी ते प्रभावी काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत