राहुरीत उद्यापासून विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत उद्यापासून विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई

राहुरी(वेबटीम) प्राणांतिक अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन मा. अपर पोलीस महासंचालक श्री. कृष्ण प्रकाश यांच्या सूचनेनुसार राहुरी पोलीस स्टे...

राहुरी(वेबटीम)



प्राणांतिक अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन मा. अपर पोलीस महासंचालक श्री. कृष्ण प्रकाश यांच्या सूचनेनुसार राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत उद्या दि. 10 फेब्रुवारी 2026 पासून हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर नियमित कारवाई करण्यात येणार आहे.

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत सन 2024 मध्ये 57 तर सन 2025 मध्ये 58 प्राणांतिक अपघात झाले असून त्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतांश अपघातांमध्ये दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर न केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अपघातातील मृत्यूदर कमी करण्याच्या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


नगर-मनमाड महामार्गावर विशेष लक्ष केंद्रित करून हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन सर्व दुचाकीस्वारांना करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत