राहुरी फॅक्टरी(वेबटीम) गुढीपाडवा व रमजान ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर राहुरी फॅक्टरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक्सने ग्राहकांसाठी आकर्षक फेस्टिव्ह...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
गुढीपाडवा व रमजान ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर राहुरी फॅक्टरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक्सने ग्राहकांसाठी आकर्षक फेस्टिव्हल ऑफर जाहीर केली आहे. ₹9,999 किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवर सुंदर पैठणी साडी मोफत देण्यात येणार आहे.
या ऑफरमध्ये विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर विशेष सूट देण्यात येत असून ग्राहकांसाठी झिरो डाऊन पेमेंटची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आकर्षक कॅशबॅक मिळणार आहे. कॅश पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी इन्स्टंट डिस्काउंटचीही सुविधा देण्यात आली आहे.
याशिवाय स्मार्टफोन खरेदीवर फक्त 99 रुपयांमध्ये 24 महिन्यांची वॉरंटी देण्याची विशेष योजना देखील उपलब्ध आहे.
ही ऑफर 17 मार्च ते 22 मार्च 2026 या कालावधीत राहुरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या मुख्य शाखा (नगर–मनमाड हायवे, राहुरी फॅक्टरी) तसेच पोस्ट ऑफिसजवळ, जैन मंदिर समोर असलेल्या शाखेत उपलब्ध राहणार आहे. अधिक माहितीसाठी 7767057878, 9511007878 व 8013777878 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत