पानेगांव (वार्ताहर) पानेगांव (ता नेवासे) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २००४ ते २००९ या सालात शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे उत्तम अस कार्य बजाव...
पानेगांव (वार्ताहर)
पानेगांव (ता नेवासे) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २००४ ते २००९ या सालात शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे उत्तम अस कार्य बजावून सोनई पोलीस ठाण्याचे इन्चार्ज सपोनि अनिल मोरे यांची पदावर नियुक्ती झाली असून आम्हा प्रत्येक पानेगांवकरांना अभिमान आहे असं गौरवोद्गार मुळा कारखान्याचे जेष्ठ संचालक,पानेगांवचे माजी लोकनियुक्त सरपंच तथा सोनई करजगांव १८गांव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष संजय जंगले यांनी पोलीस ठाण्यात स.पो.नि.अनिल मोरे यांचा सन्मान करताना बोलतं होते.
जंगले यांनी सांगितले की, सपोनि अनिल मोरे हे पानेगांव शिक्षक म्हणून कार्यरत असताना प्रभावी व्यक्तिमत्त्व तसेच उत्तम वक्तृत्व त्याच बरोबर गरीब विद्यार्थ्यांना स्व- खर्चाने वह्या पुस्तके पुरवित शाळेला त्यांनी आपलं कुटुंब मानलं विद्यार्थी शाळेत जर आला नाही तर पालकांशी संपर्क साधून घरी जाऊन विचारपूस करायचं आज पानेगांव शाळा नावलौकिक मिळविला आहे त्यामध्ये इतर शिक्षकांन बरोबरच मोरे यांचे योगदान लाभले आहे. असे चांगले कार्य बजाविणारे मोरे पोलीस प्रशासनतहि कौस्तुकास्पद कार्य बजावतील तसेच सोनई पोलीस ठाण्याअंतर्गत ढासळलेली कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वरिष्ठांचा मार्गदर्शनाखाली ठोस उपाययोजना राबवतील असा ठाम विश्वास जंगले यांनी व्यक्त केला.
यावेळी पानेगांवचे उपसरपंच सुरेश जंगले, शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष संदिप जंगले, ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील, एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार, विलास बर्डे, पोपटराव जंगले आदी उपस्थित होते.
पानेगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे जवळपास पाच वर्षे ज्ञानदानाचे कार्य केले. त्या कार्यक्षेत्रात पुन्हा पोलीस अधिकारी म्हणून सेवा करण्याची संधी मिळते मी माझं भाग्य समजतो. वरिष्ठांचा मार्गदर्शनाखाली सामन्य व्यक्ती केंद्रबिंदू मानून प्रत्येक घटकांना न्याय देण्यासाठी कटीबद्ध राहिलं-
स.पो.नि. अनिल मोरे सोनई पोलीस स्टेशन

कोणत्याही टिप्पण्या नाहीत