राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी व परिसरात मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वा...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी व परिसरात मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा नगरपरिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
विशेषतः वैष्णवी चौक परिसरात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. एका चिमुरडीवर भटक्या कुत्र्याने हल्ला करून तिला गंभीर स्वरूपाचे चावे घेतला आहे. या घटनेनंतर पालकवर्ग आणि स्थानिक नागरिक अधिकच चिंतेत पडले आहेत.
याशिवाय, राहुरी फॅक्टरी परिसरातील विविध भागांत मोकाट जनावरांकडून नागरिकांवर हल्ल्याच्या तसेच अपघातांच्या घटना घडत असल्याची माहिती समोर येत आहे.
या सर्व परिस्थितीमुळे संतप्त नागरिकांनी देवळाली प्रवरा नगरपरिषदेकडे तातडीने लक्ष देऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
संबंधित विभागाने कुत्रे पकड मोहीम राबवून तसेच जनावरांच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत