राहुरी फॅक्टरी(वेबटीम) श्रीराम जन्मोत्सव ते श्री हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने राहुरी फॅक्टरी येथील जुने हनुमान मंदिर, शनैश्वर मंदिर , ब...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
श्रीराम जन्मोत्सव ते श्री हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने राहुरी फॅक्टरी येथील जुने हनुमान मंदिर, शनैश्वर मंदिर , बैलगाडी यार्ड येथे गुरुवार २६ मार्च ते गुरुवार २ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
सप्ताह काळात काकडा भजन, कीर्तन, प्रवचन, भजन व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यात प्रसिद्ध कीर्तनकार व सहभागी होणार असून भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन मिळणार आहे.
सप्ताहात ह.भ.प. गोविंद महाराज माळी, ह.भ.प. पांडुरंग महाराज गिरी, ह.भ.प. स्वामी अरुणानंद गिरी महाराज, डॉ.शुभम महाराज कांडेकर, चैतालीताई जाधव, ज्ञानेश्वरीताई बागुल, डॉ.सुदाम महाराज पानेगावकर, महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांची किर्तन दररोज रात्री ७ ते ९ या वेळेत किर्तन पार पडतील.त्यानंतर दररोज महाप्रसाद पंगत होणार आहे.,
गुरुवार २ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ महंत अर्जुन महाराज तनपुरे यांच्या काल्याचे किर्तन व महाप्रसाद पंगतीने सोहळ्याची सांगता होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत