श्रीरामपूर तहसीलदारांचा वाळू माफियांना दणका - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपूर तहसीलदारांचा वाळू माफियांना दणका

श्रीरामपूर(संदीप पाळंदे) तालुक्यातील अवैध धंद्यांविरुद्ध महसूल विभागाने आपली आक्रमक मोहीम सुरूच ठेवली असून प्रांताधिकारी किरण सावंत पाटील या...

श्रीरामपूर(संदीप पाळंदे)



तालुक्यातील अवैध धंद्यांविरुद्ध महसूल विभागाने आपली आक्रमक मोहीम सुरूच ठेवली असून प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्या आदेशानुसार, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मातुलठाण येथे गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळूची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर भरारी पथकाने रंगेहाथ पकडला असून, वाळू माफियांमध्ये या 'धुरंधर' कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

​​मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, महसूल विभागाच्या पथकाने मौजे मातुलठाण येथील गोदावरी नदी पात्रात सापळा रचला होता. यावेळी ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. १७ सी.एक्स. ७६१२  हा अनधिकृतरीत्या वाळूची वाहतूक करताना आढळून आला. पथकाने तातडीने झडप घालत हा ट्रॅक्टर ताब्यात घेतला. सदर वाहन सध्या श्रीरामपूर तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले असून सहा. महसूल अधिकारी अशोक नरोड यांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

​या धडक कारवाईत महसूल विभागाचे 'धुरंधर' व अनुभवी मंडळ अधिकारी प्रशांत ओहोळ, ग्राम महसूल अधिकारी ​प्रदीप चव्हाण, ​तुषार आगळे, सुरेंद्र पवार, राहुल साठे, गोविंद खैरनार यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या धडाकेबाज कारवाईमुळे तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचा कडक इशारा...

​"गोदावरी नदी पात्रातून अनधिकृत वाळू उपसा किंवा वाहतूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. मातुलठाण येथील कारवाई ही केवळ सुरुवात असून, यापुढेही तालुक्यातील अशा अवैध धंद्यांवर महसूलचे 'धुरंधर' पथक करडी नजर ठेवून असेल. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल."

मिलिंदकुमार वाघ, तहसीलदार, श्रीरामपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत