देवळाली प्रवरा येथे उद्या गुरुवारी श्रीराम जन्मोत्सव सोहळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा येथे उद्या गुरुवारी श्रीराम जन्मोत्सव सोहळा

देवळाली प्रवरा(वेबटीम) शहरातील  श्रीराम मंदिरात गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार ...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



शहरातील  श्रीराम मंदिरात गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता गंगाजल स्नानाने होणार असून, सकाळी ८ वाजता  अभिषेक करण्यात येईल.सकाळी १० वाजता ह.भ.प. श्री. मच्छिंद्र महाराज निकम (नेवासा) यांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे.

दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव व महाआरती पार पडणार असून, त्यानंतर दुपारी १२:३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता प्रभू श्रीरामांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

या सोहळ्यास सर्व भाविकांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव समिती व ग्रामस्थ, देवळाली प्रवरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत