देवळाली प्रवराच्या मंजूर नवीन पोलीस ठाण्याबाबत सेनेचे सुनील कराळे यांचे एसपी घार्गे यांना निवेदन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवराच्या मंजूर नवीन पोलीस ठाण्याबाबत सेनेचे सुनील कराळे यांचे एसपी घार्गे यांना निवेदन

राहुरी(वेबटीम)  देवळाली प्रवरा येथे नवीन पोलीस स्टेशन सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदन देण...

राहुरी(वेबटीम)



 देवळाली प्रवरा येथे नवीन पोलीस स्टेशन सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदन देण्यात आले आहे. शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाचे जिल्हा प्रमुख सुनील कराळे यांनी हे निवेदन सादर केले.


निवेदनात म्हटले आहे की, देवळाली प्रवरा परिसरात १९९० साली पोलीस स्टेशनला मंजुरी मिळाली होती. मात्र काही कारणास्तव आजपर्यंत ते कार्यान्वित झालेले नाही. दरम्यान, नव्या सरकारच्या काळात जिल्ह्यात नवीन पोलीस स्टेशन मंजूर करण्यात आले असून त्यामध्ये देवळाली प्रवरा याचाही समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

देवळाली प्रवरा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात सुमारे ३२ गावे येत असून नागरिकांची ही दीर्घकालीन मागणी आहे.


 कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने या भागात स्वतंत्र पोलीस स्टेशनची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.तसेच, या पोलीस स्टेशनसाठी आवश्यक जागा व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यास स्थानिक पातळीवरून तयारी दर्शविण्यात आल्याचेही निवेदनात नमूद आहे. त्यामुळे प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर देवळाली प्रवरा येथे पोलीस स्टेशन सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत