देवळाली प्रवरात भाजपकडून इफ्तार पार्टी; सर्वधर्मीय ऐक्याचा संदेश - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात भाजपकडून इफ्तार पार्टी; सर्वधर्मीय ऐक्याचा संदेश

राहुरी(वेबटीम) पवित्र रमजान महिन्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देवळाली प्रवरात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा...

राहुरी(वेबटीम)



पवित्र रमजान महिन्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देवळाली प्रवरात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

या वेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम, मच्छिंद्र कदम, भाऊसाहेब वाळुंज, व्यापारी संघटनेचे सतिषभाऊ वाळुंज, तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन कोठुळे व सचिन घोरपडे उपस्थित होते.






यावेळी बोलताना माजी आमदार चंद्रशेखर कदम म्हणाले की, रमजान हा संयम, त्याग आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र महिना आहे. इफ्तारसारख्या कार्यक्रमांमुळे समाजातील सर्व घटक एकत्र येतात आणि परस्परांतील प्रेम, विश्वास व बंधुभाव अधिक दृढ होतो.

आजच्या काळात सर्वधर्मीय ऐक्य जपणे ही समाजाची मोठी गरज आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सौहार्द निर्माण होऊन एकमेकांबद्दल आदराची भावना वाढीस लागते. 

कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील रफीक शेख, मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अकीलबाबा पटेल, अजीज शेख, मुनीर शेख, मोहसीन शेख, अझहर शेख, भैय्या तांबोळी, हाजी शेख, नबी शेख, मौलाना अबुबकर शेख, अल्फाज सय्यद, आदिल इनामदार, शकील शेख, उमर इनामदार, समद इनामदार, अब्बास सय्यद, बाबजान शेख यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून सर्वधर्मीय ऐक्य, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार रफीक शेख यांनी मांडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत