राहुरी फॅक्टरीतील आदिनाथ वसाहतीत आजपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील आदिनाथ वसाहतीत आजपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहतीमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्या...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहतीमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून हा त्रिदिनी धार्मिक सोहळा आज मंगळवार दि. ३१ मार्च २०२६ ते शुक्रवार दि. ३ एप्रिल २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. या सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार मंगळवार दि. ३१ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून मूर्तीचा जलाधिवास होणार आहे. त्यानंतर बुधवार दि. १ एप्रिल रोजी मूर्तीचा धान्याधिवास तसेच सायंकाळी ४ वाजता ग्रामप्रदक्षिणा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम गुरुवार दि. २ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा व शिखर कलशारोहण असा होणार असून संत कवी महिपती महाराज देवस्थानचे मठाधिपती महंत ह.भ.प. अर्जुन महाराज तनपुरे यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडणार आहे. तसेच शुक्रवार दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री यांचे प्रवचन व महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे



या धार्मिक कार्यक्रमासाठी समस्त ग्रामस्थ, आदिनाथ वसाहत, राहुरी फॅक्टरी यांच्या वतीने सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत