देवळाली प्रवरात उद्या सुरेंद्र थोरात यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात उद्या सुरेंद्र थोरात यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील बाजारतळ परिसरात बुधवार दि. १ एप्रिल २०२६ रोजी आरपीआय जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक सुरेंद्र थोरात ...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



देवळाली प्रवरा येथील बाजारतळ परिसरात बुधवार दि. १ एप्रिल २०२६ रोजी आरपीआय जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक सुरेंद्र थोरात यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दिवसभर विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.


सकाळी १० वाजता नेत्र तपासणी शिबिर, मोफत चष्मे वाटप तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे.

सायंकाळी ६ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून ही मिरवणूक सोसायटी डेपो चौक ते बाजारतळ या मार्गावरून निघणार आहे.


 त्यानंतर सायंकाळी ७ वाजता व्याख्यानाचा कार्यक्रम होणार असून विविध पुरस्कारप्राप्त व्याख्याते  प्रदीपजी सोळंके हे मार्गदर्शन करणार आहेत.


रात्री ८ वाजता अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार आहे. तसेच या कार्यक्रमात नगरसेविका सुनिता सुरेंद्र थोरात यांच्या हस्ते सफाई कामगार, घरकामगार आणि शेतमजूर महिलांना किराणा वाटप करण्यात येणार आहे. रात्री ८.३० नंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.


या कार्यक्रमाचे आयोजन सुरेंद्रभाऊ थोरात मित्र मंडळ व मित्र परिवार, अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत