देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील काकासाहेब चौकात आज, बुधवार दिनांक २ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्री हन...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील काकासाहेब चौकात आज, बुधवार दिनांक २ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
हनुमान जयंतीच्या पावन पर्वानिमित्त धार्मिक वातावरणात हा कार्यक्रम पार पडणार असून, महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा उपक्रम ठरणार आहे.
देवळाली प्रवरा परिसरातील नागरिकांनी आणि भाविकांनी वेळेत उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असेही आयोजकांनी नमूद केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत