राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील जातप येथील रहिवासी संपत महाराज जाधव यांच्या घरावर वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे झाड कोसळल्...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील जातप येथील रहिवासी संपत महाराज जाधव यांच्या घरावर वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत घराच्या छताचे व भिंतींचे नुकसान झाले असून घरातील काही साहित्यही खराब झाले आहे.
अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घराशेजारील झाड उन्मळून थेट घरावर पडल्याने कुटुंबीयांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.
अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे परिसरातील शेतपिकांसह घरांचेही नुकसान होत असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पंचनामा करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत