काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सांगता राहुरी फॅक्टरी परिसर आठ दिवस हरिनाम, कीर्तन व महाप्रसादाने गजबजला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सांगता राहुरी फॅक्टरी परिसर आठ दिवस हरिनाम, कीर्तन व महाप्रसादाने गजबजला

राहुरी फॅक्टरी (वेबटीम)   श्रीराम जन्मोत्सव ते श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त राहुरी फॅक्टरी येथील जुने हनुमान मंदिर, शनैश्वर मंदिर आणि बैलगा...

राहुरी फॅक्टरी (वेबटीम) 



 श्रीराम जन्मोत्सव ते श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त राहुरी फॅक्टरी येथील जुने हनुमान मंदिर, शनैश्वर मंदिर आणि बैलगाडी यार्ड परिसरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

गुरुवार २६ मार्च ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या सप्ताहात दररोज काकडा भजन, कीर्तन, प्रवचन, भजन तसेच विविध आध्यात्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. नामवंत कीर्तनकारांच्या उपस्थितीमुळे भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

सप्ताहादरम्यान ह.भ.प. गोविंद महाराज माळी, ह.भ.प. पांडुरंग महाराज गिरी, स्वामी अरुणानंद गिरी महाराज, डॉ. शुभम महाराज कांडेकर, चैतालीताई जाधव, ज्ञानेश्वरीताई बागुल, डॉ. सुदाम महाराज पानेगावकर आणि महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी दररोज रात्री ७ ते ९ या वेळेत कीर्तन सेवा देत भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन केले. त्यानंतर दररोज महाप्रसाद पंगतीचे आयोजन करण्यात आले.

सप्ताहाची सांगता गुरुवार २ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत महंत अर्जुन महाराज तनपुरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यानंतर महाप्रसाद पंगतीने सप्ताहाचा समारोप उत्साहात करण्यात आला.

राहुरी फॅक्टरी परिसरात आठ दिवस सुरू असलेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे सर्वत्र भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत