राहुरी(वेबटीम) राहुरी तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुका प्रमुख सचिन म्हसे व युवा सेना तालुकाप्रमुख रोहन भुजाडी यांनी आपल्...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुका प्रमुख सचिन म्हसे व युवा सेना तालुकाप्रमुख रोहन भुजाडी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
हा प्रवेश सोहळा भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सभापती राम शिंदे, आ.मोनिका राजळे, युवा नेते अक्षय कर्डिले यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या भव्य शक्तीप्रदर्शनामुळे राहुरी तालुक्यात भाजपने आपली ताकद उघडपणे दाखवून दिल्याची चर्चा रंगली आहे.
म्हसे व भुजाडी यांच्यासोबत अमित भागवत, विजय ठुबे, भीमराज म्हसे, मधुकर म्हसे, नाथा कार्डिले, आपासाहेब म्हसे,राकेश म्हसे, लक्ष्मण घाडगे, दीपक घाडगे, बाबा गाडे, रविराज दौले, दत्ता शिंदे, विवेक धसाळ, कृष्णा म्हसे, सौरभ भालेराव, आकाश कोळसे, संदीप शिंदे, अक्षय काळे, किरण डौले, चैतन्य म्हसे, पोपट खुळे, दिगंबर कदम, पप्पू जाधव, लखन कानडे, आप्पासाहेब म्हसे, जयेश म्हसे, संतोष म्हसे, सुदर्शन म्हसे, सुरेश म्हसे, भागवत मोरे, शुभम म्हसे, शिवम कोकाटे, मयूर ढसाळ, कमलेश परदेशी, अभिषेक कोळसे, शुभम कोळसे, हरी कोळसे, अमोल बर्डे, हर्षद कोळसे, विशाल कोळसे, अमोल कोळसे, नारायण घाडगे, बंडू घाडगे, मच्छिंद्र दिवे, गोपीनाथ बर्डे, चैतन्य भांड यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
या मोठ्या राजकीय हालचालीमुळे राहुरी तालुक्यातील शिवसेना (उबाठा) गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत