राहुरी फॅक्टरीतील शांती चौकात श्री साईसच्चरित पारायण व कीर्तन महोत्सव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील शांती चौकात श्री साईसच्चरित पारायण व कीर्तन महोत्सव

राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी ) येथील शांती चौक मित्र मंडळ, राहुरी फॅक्टरी यांच्या विद्यमाने श्री साईसच्चरित पारायण सोहळा व डॉ. बाबासाहेब आंबेडक...

राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी)



येथील शांती चौक मित्र मंडळ, राहुरी फॅक्टरी यांच्या विद्यमाने श्री साईसच्चरित पारायण सोहळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य कीर्तन महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक व सामाजिक कार्यक्रम मंगळवार दि. ७ एप्रिल २०२६ ते मंगळवार दि. १४ एप्रिल २०२६ या कालावधीत शांती चौक मित्र मंडळ, राहुरी फॅक्टरी येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.


या सोहळ्यात दररोज पहाटे काकड आरती, सकाळी श्रीसाई सच्चरित पारायण, दुपारी मध्याह्न आरती, सायंकाळी हरिपाठ, धुपारती आणि रात्री भव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहभर विविध नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार आपली सेवा देणार आहेत.

कार्यक्रमात ह.भ.प. बाळकृष्ण महाराज खांदे, युवाकीर्तनकार ह.भ.प. अमोल महाराज बडाख, ह.भ.प. चंद्रकांत महाराज खळेकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बावळे, ह.भ.प. मनोहर महाराज सिनारे तसेच आचार्य डॉ. ह.भ.प. शुभम महाराज कांडेकर यांची कीर्तने आणि प्रवचने होणार आहेत. तसेच समारोपाच्या दिवशी महंत ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.


या धार्मिक सोहळ्यामुळे राहुरी फॅक्टरी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून साईभक्त, वारकरी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत