देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) श्रावणी इंटरप्राइजेसचे डायरेक्टर तसेच देवळाली गावचे सुपुत्र श्री. संदीप पंडित यांना “महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्क...
देवळाली प्रवरा (प्रतिनिधी)
श्रावणी इंटरप्राइजेसचे डायरेक्टर तसेच देवळाली गावचे सुपुत्र श्री. संदीप पंडित यांना “महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्कार २०२६” जाहीर झाला आहे. NGO क्षेत्रात गेल्या १२ वर्षांपासून CSR फंडिंग, सामाजिक उपक्रम आणि समाजोपयोगी कामांमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्कार त्यांना सलग दुसऱ्यांदा जाहीर झाला असून, त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक बांधिलकीची ही राज्यस्तरीय पातळीवर घेतलेली दखल मानली जात आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक सामाजिक संस्था, युवक आणि गरजू घटकांना मोठा आधार मिळाला आहे.
हा गौरव सोहळा रविवार, दि. १९ एप्रिल रोजी पुणे येथील पत्रकार भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.
यावेळी प्रतिक्रिया देताना श्री. संदीप पंडित यांनी हा पुरस्कार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कार्याला अर्पण करत असल्याचे सांगितले. समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांसाठी सुरू असलेले सामाजिक कार्य भविष्यातही अधिक जोमाने सुरू ठेवणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या निवडीमुळे देवळाली गावासह राहुरी तालुक्यात अभिमानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत