राहुरी फॅक्टरीत अवजड वाहनाच्या धडकेत पोल-ट्रान्सफार्मर जळाला; तीन दिवसांनीही गुन्हा नाही महावितरणचे लाखोंचे नुकसान, अवजड वाहनाला ‘क्लीनचिट’? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत अवजड वाहनाच्या धडकेत पोल-ट्रान्सफार्मर जळाला; तीन दिवसांनीही गुन्हा नाही महावितरणचे लाखोंचे नुकसान, अवजड वाहनाला ‘क्लीनचिट’?

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-   राहुरी फॅक्टरी येथे प्रसादनगर भागात एका अवजड वाहनाने महावितरणच्या पोलला जोरदार धडक दिली. त्यात महावितरणचा एक सिम...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

 राहुरी फॅक्टरी येथे प्रसादनगर भागात एका अवजड वाहनाने महावितरणच्या पोलला जोरदार धडक दिली. त्यात महावितरणचा एक सिमेंटचा पोल, विद्युत वाहिन्या तुटल्या. २०० केव्हीए क्षमतेचे एक ट्रांसफार्मर जळून खाक झाले. महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेला तीन दिवस उलटले. परंतु महावितरण तर्फे संबंधित अवजड वाहनावर गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे या वाहनाला क्लीनचिट दिली काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. 



     राहुरी फॅक्टरी येथे शनिवारी (ता. ११) रात्री नऊ वाजता ताहाराबाद रस्त्यावरील प्रसादनगर भागातील एका विद्युत पोलला एका अवजड वाहनाने जोरदार धडक दिली होती. त्यात विजेचा पोल तुटून एका घरावर पडला होता. त्यामुळे घराच्या भिंतीचे नुकसान झाले होते. एका दुचाकीचे नुकसान झाले होते. पोलवरील विद्युत वाहिन्या तुटून जमिनीवर आल्या होत्या. पोल जवळील २०० केव्हीए क्षमतेचा एक मोठा ट्रांसफार्मर जळून खाक झाला होता. नशीब बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नव्हती. 

     या घटनेनंतर प्रसादनगर, गुरुकुल वसाहत व समर्थ नगर या तीन मोठ्या वसाहतींमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. घटनेच्या दिवशी शनिवारी रात्री, दुसऱ्या दिवशी रविवारी दिवसभर व रात्रभर, तसेच तिसऱ्या दिवशी सोमवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित राहिला. काल सोमवारी रात्री १० वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला.  त्यामुळे या तीन मोठ्या वसाहतींमधील नागरिकांना तीन दिवस अंधारात राहावे लागले. 

     वसाहतींमधील हजारो नागरिक, लहान मुले, आजारी रुग्ण, वृद्ध महिला व पुरुष यांना वीज पुरवठा नसल्याने भरधाव वाहन चालकाने अपघात करून वेठीस धरले. या घटनेत महावितरणची लाखो रुपयांचे नुकसान झाले. महावितरणला नवीन सिमेंटचा पोल, नवीन वीजवाहिन्या, २०० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रांसफार्मर बसवावा लागला. एवढे नुकसान होऊन तीन दिवस उलटले तरी अपघात केलेल्या अवजड वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नाही. 

      याबाबत महावितरणचे राहुरी फॅक्टरी येथील प्रभारी विद्युत अभियंता अहिरे यांनी पत्रकारांशी बोलतांना उडवाउडवीची उत्तरे दिली. वरिष्ठांनी सांगितल्याशिवाय गुन्हा दाखल केला जाणार नाही.  आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू, असे सांगून अपघात केलेल्या अवजड वाहन मालक व चालकाला पाठीशी घातले. त्यामुळे त्यांनी अवजड वाहन चालकाकडून काही चिरीमिरी घेऊन क्लीनचीट दिली आहे काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत