पानेगांव (वार्ताहर) पानेगांव (ता. नेवासे) येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मंगळवार दि ...
पानेगांव (वार्ताहर)
पानेगांव (ता. नेवासे) येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मंगळवार दि १४ रोजी सकाळी ९ वा .डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौथऱ्यावर आकर्षक फुलसजावट, सडा रांगोळी, बरोबरच भिम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तोफांचा सलामीने धम्मचक्र ध्वज अनावरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक येथे हि पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आले. ग्रामपंचायत पानेगांव कार्यालयात लोकनियुक्त सरपंच सौ. निकीता भोसले/ आंबेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पुजन करून अभिवादन केले.भिम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बी, आर वाघमारे, सुनिल भवार,विजय वाघमारे, राजेंद्र शेंडगे संजय पवार यांनी नियोजन केले.यावेळी
सोनई करजगांव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष संजय जंगले, पानेगांव ग्रामपंचायत जेष्ठ सदस्य दत्तात्रय घोलप,पानेगांव संस्थेचे मार्गदर्शक जालिंदर जंगले,पानेगांव ग्रामपंचायत माजी उपसरपंच जयवंत गुडधे, हरिभाऊ जंगले, डॉ. काकडे, गजानन चिंधे ,बारकू जंगले, पांडुरंग जंगले, सुनिल भवार, बी वाय वाघ, बी आर वाघमारे, संजय पवार, राजेंद्र शेंडगे, बापूराव जंगले, दिलीप वाघमारे, सुभाष गागरे, अंकुश जिवरक, सुदाम जंगले, शिवाजी जंगले, नामदेव चिंधे बबनराव जंगले, बाळासाहेब वाघमारे, संजय वाघमारे, विजय वाघमारे, विजय जंगले, बाळासाहेब वतनदार आदीं सह ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत