देवळाली प्रवरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य-दिव्य मिरवणूक संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य-दिव्य मिरवणूक संपन्न

देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी ...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.


यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली प्रवरा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध मान्यवरांसह युवक, महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


यावेळी सुरेंद्र थोरात, गटनेते दासू भाऊ पठारे, नगरसेवक शरद वाळुंज, वैभव गिरमे, दत्ता पाटील, पत्रकार रफिक शेख, प्रहारचे आप्पासाहेब ढुस, दीपक पठारे, गंगा गायकवाड, किशोर पंडित यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते महामानव भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

तसेच सागर संसारे, राकेश संसारे, माऊली भागवत, कुमार भिंगारे, जयदीप पंडित, पंकज संसारे, विशाल पंडित, प्रतिक डोंगरे, सूरज संसारे, असिफ पटेल, नाना पोटफोडे, किशोर गायकवाड, नयन संसारे, वैभव संसारे, महेश संसारे, साहिल संसारे, शैलेश शिरसाठ, ऋषी शिरसाठ आदींसह अनेक कार्यकर्ते व महिला नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत