गुहा येथील वाबळे वस्तीवर १८ एप्रिलपासून साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गुहा येथील वाबळे वस्तीवर १८ एप्रिलपासून साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन

गुहा(वेबटीम) गुहा येथील श्रीसाईबाबा मंदिर, वाबळे वस्ती, तांभेरे रोड येथे साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रद्धा आणि स...

गुहा(वेबटीम)



गुहा येथील श्रीसाईबाबा मंदिर, वाबळे वस्ती, तांभेरे रोड येथे साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या या सप्ताहाला यंदा नववे वर्ष पूर्ण होत असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

हा पारायण सोहळा शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ ते शुक्रवार, दि. २४ एप्रिल २०२६ या कालावधीत होणार आहे. दररोज सकाळी ७.३० ते ११ वाजेपर्यंत ग्रंथवाचन आयोजित करण्यात आले असून भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सोहळ्याचा समारोप शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी होणार असून त्यानिमित्त महंत ह.भ.प. उद्धवजी महाराज मंडलिक (नेवासेकर) यांचे सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे समस्त वाबळे परिवार व साई भक्त यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत