मुंबई(वेबटीम) राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाली असू...
मुंबई(वेबटीम)
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाली असून, यामुळे धर्मांध शक्तींना बळ मिळत असल्याचे गंभीर वक्तव्य केले होते. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापलं होतं. आता शरद पवार गटाकडून भाजप आणि हिंदुत्ववादी प्रतिगामी विचारांचे असल्याचा दावा करणाऱ्या २० कीर्तनकार आणि घुसखोरांची यादी जाहीर केली आहे. पवार गटाच्या यादीत भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांचेही नाव असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रातील वारकर संप्रदायाला संपवण्यासाठी उत्तर भारतातून काहीजण इथं येत असल्याचा आरोपही पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला. त्यांनी वारकरी संप्रदायात 'घुसखोर' म्हणून काम करणाऱ्या २० प्रमुख लोकांची नावे जाहीर करत राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, "वारकरी संप्रदाय हा सनातन धर्मापेक्षा वेगळा आहे. सध्या या पवित्र संप्रदायाला संपवण्यासाठी उत्तर भारतातून काही लोक येत आहेत," असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे.
विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायाचा इतिहास मांडताना सांगितले की, "संत नामदेव महाराजांनी पहिल्यांदा भगव्या रंगाची पताका हातात घेतली आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी पहिला ग्रंथ दिला. सनातन धर्माचे अधिष्ठान आणि ग्रंथ वेगळे आहेत. वारकरी विचार कोणत्याही प्रकारचा भेदभाव मानत नाही. मात्र, दुर्दैवाने सर्व संतांना त्यावेळच्या धर्ममार्तंडांनी छळले आहे. सुफी समुदायालाही मुल्ला-मौलवींनी त्रास दिला आहे, कारण सुफी विचार त्यांना मान्य नाही."
शरद पवार गटाने जाहीर केलेली २० नावे कोणती?
१) किशोर व्यास (उर्फ गोविंद देवगिरी)
२) चारुदत्त आफळे
३) बंडातात्या कराडकर
४) प्रकाश जवंजाळ
५) तुषार भोसले
६) अक्षय भोसले
७) संग्राम भंडारे
८) योगी निरंजन
९) एकनाथ सदगिर
१०) ज्ञानेश्वर जळकीकर
११) संजय पाचपोर
१२) भास्करगिरी महाराज (देवगड)
१३) संजय नाना धोंडगे
१४) राणा वास्कर
१५) चंद्रशेखर देगलूरकर
१६) उद्भोद पैठणकर
१७) शाम राठोड
१८) किशोर शिवनीकरण
१९) रामगिरी महाराज
२०) निरंजन कोटेकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत