राहुरी(वेबटीम) राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणगर येथे राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार...
राहुरी(वेबटीम)
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणगर येथे राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या निवडणुकीत उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.
काल कणगर गावात कार्यकर्त्यांनी एकत्र येत अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराला सुरुवात केली. या वेळी गोरक्षनाथ नालकर, वसंत घाडगे, अनिल घाडगे, सुयोग नालकर, तंटामुक्ती अध्यक्ष गोविंदराव दिवे, अन्सार शेख, भाऊसाहेब अडभाई, भाऊसाहेब खाटेकर, मच्छिंद्र वरघुडे, जयसिंग घाडगे, राजू दिवे, किशोर दिवे, अनिल नालकर, भाऊसाहेब दिवे, धनंजय बर्डे, शिवाजी वरघुडे, साहेबराव वरघुडे, रावसाहेब जाधव, भगवान घाडगे, फैयाज शेख, राजेंद्र जाधव, मच्छिंद्र शेटे, अमोल दिवे, एकनाथ गाढे, बाबासाहेब गाढे, विनायक दिवे, सुभाष नालकर, बाळासाहेब गाढे, शिवाजी जाधव, सदाशिव जाधव, पोपट नालकर, एकनाथ गाडे आदी उपस्थित होते.
यावेळी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कोळगे, भाजप जिल्हा सरचिटणीस अमोल भनगडे, विक्रम तांबे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शिवाजीराव जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत