देवळाली प्रवरा(वेबटीम) येथे सद्गुरू कबीर धर्मदास वंशावली मिशनच्या वतीने “सदगुरू कबीर साहेब नवोदयं यात्रा” निमित्ताने एक भव्य धार्मिक कार्यक्...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
येथे सद्गुरू कबीर धर्मदास वंशावली मिशनच्या वतीने “सदगुरू कबीर साहेब नवोदयं यात्रा” निमित्ताने एक भव्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात परमपूज्य १६ वे वंश प्रतापाचार्य पंथ श्री हुजूर उदितमुनि नाम साहेब यांचे प्रवचन व भेट-बंदगी सोहळा पार पडणार आहे.
रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम देवळाली प्रवरा शहरात होणार असून, यावेळी भाविकांना दर्शन व आशीर्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ५ वाजता आगमन व स्वागत यात्रेने होईल. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता प्रवचन व दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रात्री ८ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक व आध्यात्मिक सोहळ्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाचे आयोजन समस्त SKDV कमिटी, अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम विश्वकर्मा चौक, देवळाली प्रवरा येथे पार पडणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत