राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडवरील विठामाधव कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन आज अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर उत्साहात ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडवरील विठामाधव कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन आज अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर उत्साहात पार पडले. या नव्या प्रकल्पामुळे परिसरातील छोट्या व मध्यम व्यावसायिकांना व्यवसायासाठी नवी संधी उपलब्ध होणार आहे.
विठामाधव पिक्चर पॅलेसच्या मैदानात १० बाय २२ फूट आकाराचे फॅब्रिकेटेड गाळे उभारण्यात येणार असून, हे गाळे भाडेतत्त्वावर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार आहे.
या भूमिपूजन प्रसंगी सुखदेवराव मुसमाडे, भाऊसाहेब मुसमाडे, जयेश मुसमाडे, प्रशांत मुसमाडे, बाबासाहेब मुसमाडे, प्रकाश नवले गुरु, संदीप कोठुळे,अनिल येवले, विधीज्ञ विवेक तांबे, बाळासाहेब ससाणे, संजय मालकर, श्री. डोंगरे,विकास मुसमाडे यांच्यासह मुसमाडे कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत