महिला स्वावलंबनासाठी छोटे व्यवसाय गरजेचे– प्रीती कदम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

महिला स्वावलंबनासाठी छोटे व्यवसाय गरजेचे– प्रीती कदम

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)  स्थानिक पातळीवर महिलांना स्वावलंबी होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. छोट्या उद्योगांमुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळ...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



 स्थानिक पातळीवर महिलांना स्वावलंबी होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. छोट्या उद्योगांमुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळते आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन प्रीती सत्यजित कदम यांनी केले.



राहुरी फॅक्टरी परिसरात ‘ग्रिशा’ज ब्युटी’ या नवीन पार्लरचे उद्घाटन रविवारी (दि. १९ एप्रिल २०२६) उत्साहात पार पडले. ओम गुरुदेव निवास, सरस्वती कॉलनी, डीपॉल स्कूल रोड, राहुरी फॅक्टरी येथे झालेल्या या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या या पार्लरमुळे आधुनिक सौंदर्यसेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.



कार्यक्रमासाठी श्रुती गणेश मोढवे व मोढवे परिवार यांनी उपस्थितांचे स्वागत करत आभार मानले.

प्रीती सत्यजित कदम यांच्या हस्ते पार पडलेल्या या कार्यक्रमास नगरसेविका सुजाता कदम, चंदाराणी गाडे, माजी नगरसेविका उर्मिला शेटे, संगीता शेटे, जमुनोत्री शेटे, वैशाली शेटे यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रिशा ब्युटिकच्या श्रुती मोढवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत