प्रलंबित बिलांवरून ठेकेदार आक्रमक ,१ मेपासून वीज कामे बंद करण्याचा इशारा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्रलंबित बिलांवरून ठेकेदार आक्रमक ,१ मेपासून वीज कामे बंद करण्याचा इशारा

अहिल्यानगर(वेबटीम)  वीज वितरण व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, अहिल्यानगर विभागाच्...

अहिल्यानगर(वेबटीम)



 वीज वितरण व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, अहिल्यानगर विभागाच्या ठेकेदारांनी प्रलंबित बिलांचा प्रश्न आणि महावितरणच्या कथित मनमानी कारभाराविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. प्रशासनाकडून तातडीने निर्णय न झाल्यास १ मे २०२६ पासून HT, LT व DTC संदर्भातील सर्व प्रिव्हेंटिव्ह व ब्रेकडाऊन कामे बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ठेकेदारांच्या म्हणण्यानुसार, मागील अनेक महिन्यांपासून केलेल्या कामांची बिल रक्कम प्रलंबित असून, वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. परिणामी, ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले असून दैनंदिन कामकाज चालवणे कठीण झाले आहे.

दरम्यान, महावितरणकडून “ऑटो रॉबिन पद्धत” कोणतीही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे (SOP), प्रशिक्षण किंवा पूर्वसूचना न देता लागू करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पद्धतीमध्ये कामांचे वाटप, MO/PO प्रक्रिया, बिलिंग, पेमेंट सायकल, जबाबदाऱ्या आणि सुरक्षा नियम याबाबत स्पष्टता नसल्याने ठेकेदारांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे.

सध्या वाढत्या उन्हामुळे एसी, कुलर आणि पंख्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत १ मेपासून कामबंद आंदोलन सुरू झाल्यास वीजपुरवठा खंडित झाल्यास दुरुस्ती करण्यासाठी पुरेसा मनुष्यबळ उपलब्ध ठेवणे महावितरणसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. अन्यथा नागरिकांच्या तीव्र संतापाला सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

एकंदरीत, उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर संभाव्य वीज बिघाड आणि त्यावर होणारा विलंब यामुळे नागरिक आणि महावितरण यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत