महावितरणच्या धोरणाविरोधात ठेकेदारांचे आंदोलन, श्रीरामपूर विभाग अंधारात जाण्याची शक्यता - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

महावितरणच्या धोरणाविरोधात ठेकेदारांचे आंदोलन, श्रीरामपूर विभाग अंधारात जाण्याची शक्यता

  श्रीरामपूर(वेबटीम) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांच्या वतीने 28 एप्रिलपासून श्रीरामपूर विभागातील ठेकेदारांनी सर्व प...

 श्रीरामपूर(वेबटीम)



महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांच्या वतीने 28 एप्रिलपासून श्रीरामपूर विभागातील ठेकेदारांनी सर्व प्रकारची देखभाल व दुरुस्तीची कामे बंद केली आहेत. या आंदोलनामुळे ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित झाल्यास तो सुरळीत करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध नसेल, परिणामी संपूर्ण विभाग अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.


असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून ठेकेदारांची विविध कामांची बिले प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच, महावितरण ने कोणतीही पूर्वसूचना किंवा प्रशिक्षण न देता ऑटो रॉबिन ही नवीन प्रणाली लागू केली आहे. या प्रणालीमध्ये कामाचे वाटप, बिलिंग आणि पेमेंट सायकलबाबत स्पष्टता नसल्याने ठेकेदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.


ठेकेदारांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे 28 एप्रिलपासून संभाव्य बिघाड रोखण्यासाठी केली जाणारी प्रतिबंधात्मक कामे, अचानक झालेला बिघाड दुरुस्त करणे, उच्च व लघुदाब वाहिन्या तसेच रोहित्रांच्या दुरुस्तीची कामे पूर्णपणे बंद राहतील, असे असोसिएशनतर्फे सांगण्यात आले आहे.


सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढलेली आहे. अशा स्थितीत लाईनमध्ये बिघाड झाल्यास किंवा रोहित्र जळाल्यास दुरुस्तीसाठी अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध नसेल. परिणामी, वीज पुरवठा पूर्ववत होण्यास विलंब लागून सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ग्राहकांचा रोष महावितरणला महागात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


"आम्ही वारंवार विनंती करूनही प्रशासन सकारात्मक पावले उचलत नाही. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे म्हंटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत