टाकळीमियाॅ येथे डाॅ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ,रमाई बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य व युवा भिमसेना यांचा संयुक्त पुढाकार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

टाकळीमियाॅ येथे डाॅ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ,रमाई बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य व युवा भिमसेना यांचा संयुक्त पुढाकार

  राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील टाकळीमियाॅ येथील रमाई बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य व युवा भिमसेना टाकळीमिया, यांच्या संयुक्त विद्...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील टाकळीमियाॅ येथील रमाई बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य व युवा भिमसेना टाकळीमिया, यांच्या संयुक्त विद्यमाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


 दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त टाकळीमिया (जुना राजवाडा) येथून रमाई बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य व युवा भिमसेना टाकळीमिया, यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. गावच्या प्रथम नागरिक सरपंच श्री लीलाबाई गायकवाड यांच्या हस्ते नारळ फोडून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.


यावेळी रमाई बहुउद्देशीय संस्था संस्थापिका स्नेहलताई सांगळे, सचिव श्री. सुरेंद्र सांगळे, युवा भिमसेना टाकळीमिया अध्यक्ष श्री. विनोद सगळगिळे, श्री. प्रसाद सगळगिळे, श्री. अजिंक्य सगळगिळे, श्री. तेजस सगळगिळे, श्री. प्रफुल्ल सगळगिळे, श्री. चंद्रकांत सगळगिळे, श्री. प्रीतम सगळगिळे, श्री. राहुल सगळगिळे, श्री. दत्तात्रय सगळगिळे, श्री. सागर पाळंदे, स्वराज्य ग्रुप टाकळीमियाचे अध्यक्ष श्री. सचिन भाऊ करपे, श्री. सुभाष भाऊ जुंदरे, श्री. राहुल चोथे, यासह असंख्य भीमसैनिक व शिवसैनिक यांनी सदर मिरवणूक पार पाडण्यासाठी उत्तम नियोजन आणि मोलाचे सहकार्य केले.

अत्यंत नियोजनबद्धरित्या मिरवणूक संपूर्ण गावांमध्ये मिरवून गावातील हनुमान मंदिर येथे शिवसैनिक श्री. सचिन भाऊ करपे यांनी त्यांच्या असंख्य शिवसैनिकांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवशक्ती आणि भीमशक्ती ऐक्याचे उत्तम उदाहरण दिले. यावेळी जय भीम जय शिवराय या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत