पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त देवळाली प्रवरात विविध कार्यक्रमांचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त देवळाली प्रवरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

देवळाली प्रवरा(वेबटीम)  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त देवळाली प्रवरा येथे विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त देवळाली प्रवरा येथे विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव रविवार, दि. 31 मे 2026 रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार असून शहरातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10.30 वाजता भव्य मोटारसायकल रॅलीने होणार आहे. ही रॅली खांडोळी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावर काढण्यात येणार आहे.

सायंकाळी 4 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य सवाद्य मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात येईल.

सायंकाळी 5.30 वाजता प्रसिद्ध शिवव्याख्याते डॉ. प्रा. शिवरत्न मनोज शेटे सर यांचे व्याख्यान व समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. "सर्वगुणसंपन्न राजमाता अहिल्यादेवी" या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, देवळाली प्रवरा यांच्या वतीने आयोजित या जयंती उत्सवात सर्व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत