४२ वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण; राजेंद्र कदम यांचा देवळाली प्रवरा नगरपरिषदेत सेवापूर्ती सोहळा उत्साहात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

४२ वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण; राजेंद्र कदम यांचा देवळाली प्रवरा नगरपरिषदेत सेवापूर्ती सोहळा उत्साहात

देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा नगरपरिषदेतील कर्मचारी राजेंद्र एकनाथ कदम यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सेवापूर्ती सोहळा उत्साहात...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



देवळाली प्रवरा नगरपरिषदेतील कर्मचारी राजेंद्र एकनाथ कदम यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.


यावेळी बोलताना आमदार कदम म्हणाले की, देवळाली प्रवरा नगरपरिषदेचा प्रत्येक कर्मचारी हा मी आजपर्यंत माझाच समजत आलो आहे. मात्र प्रत्येकाने शिस्तबद्ध पद्धतीने काम केले पाहिजे. नगरपरिषदेचे नाव देशपातळीवर नेण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कार्य केले असून त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.


पुढे बोलताना त्यांनी राजेंद्र कदम यांच्या सेवेला विशेष गौरव दिला. आजपर्यंत ३५ ते ३७ वर्ष सेवा करणारे कर्मचारी पाहिले होते, मात्र तब्बल ४२ वर्षे प्रामाणिक सेवा करणारा कर्मचारी प्रथमच पाहत आहे. त्यांच्या कार्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो, असेही त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमास  शिवाजी कदम, मच्छिंद्र कदम,  बाबासाहेब कदम यांच्यासह राजेंद्र कदम यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सेवानिवृत्त अधिकारी  सुरेश मोटे, मुकुंद ढुस, सुभाष कुलट, रंगनाथ होले,  अशोक जाधव, कुंडलिक खरात तसेच नगरपरिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


कार्यक्रमात संभाजी वाळके, श्री. मोटे ,  मुकुंद ढुस,  रंगनाथ होले यांनी आपल्या मनोगतातून राजेंद्र कदम यांच्या कार्याचा गौरव केला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुपेकर साहेब यांनी केले, तर आभार प्रदर्शन भारत साळुंखे यांनी मानले. सेवापूर्ती सोहळा यशस्वी झाल्याबद्दल राजेंद्र कदम यांनी उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत